मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचं एक परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले आहे.
14 नोव्हेंबर 2020 रोजी फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), झाड यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे.
दरम्यान, हे करताना नागरिकांनी कोविड विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे, असं या परिपत्रकात नमूद केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”
“अखेर भूषण प्रधानने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना”
मी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा- राम कदम