ठाण्याच्या मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, 4 रूग्णांचा मृत्यू

0
175

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रातील प्रमाण वाढले असतानाच, दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात आज पहाटे आग लागली. यात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंब्रा येथे शिमला पार्क परिसरात हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात आज पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली.  आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, आगीची घटना घडली तेंव्हा रुग्णालयात एकूण 20 रुग्ण होते. यापैकी सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर 20 रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं. आयसीयूतील 6 रुग्णांना बिलाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यातील 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी माझं आयुष्य दयनीय बनवलं- कंगणा रणाैत

रंगतदार सामन्यात आरसीबीचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय

रेमडिसिवीर फक्त भाजपच्याच नेत्यांना कसे मिळतात; हसन मुश्रीफांचा सवाल

सर्व इंजेक्शन्स आधीच वाटली आहेत, आता रिकामी खोकी घेऊन जाऊ शकता- सुजय विखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here