आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
IPL 2021: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने 164 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हैद्राबादने राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे.
उशीरा संघात दाखल झालेल्या जेसन रॉयकडून जी अपेक्षा होती तशीच धमाकेदार कामगिरी त्याने केली आहे. त्याने दमदार असं अर्धशतक ठोकत संघाला एक उत्तम सुरुवात करुन दिली. रॉयने 42 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार ठोकत 60 धावा केल्या. चांगल्या लयीत असलेला जेसन रॉय बाद झाल्यानंतर हैद्राबादचा युवा फलंदाज प्रियम गार्गही शून्यावर बाद झाला. यानंतर केन विल्यमसनने नाबाद 51 धावांच अर्धशतक ठोकतं सामना जिंकवून दिला. त्याला अभिषेक शर्माने नाबाद 21 धावांची उत्तम साथ दिली.
राजस्थान रॉयल्सकडून संजूने धुव्वादार फटकेबाजी करत 82 धावांची अप्रतिम खेळी केली. संजूने 57 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. तर हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्मा, राशिद खान आणि भुवनेश्वर कुमार यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं”
खडसे आणि महाजनांचं मन जुळले; याला शिवसेनेचेही साथ
पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगा, आदित्य ठाकरेचा मला अभियान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अभिनेते महेश मांजरेकरांच्या छगन भुजबळ लूकची जोरदार चर्चा, नेटकरी म्हणतात…