Home महाराष्ट्र अखेर ठरलं! राज्यातील थिएटर्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय”

अखेर ठरलं! राज्यातील थिएटर्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. शाळा आणि मंदीरे उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर आता राज्यातील गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेली थिएटर सुरू होणार असल्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आता 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी आज चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. सरकारच्या या निर्णयामुळे कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला- जयंत पाटील

‘धार्मिक स्थळे उघडून मोठे काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका’; आशिष शेलारांची राज सरकारवर टीका

राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग ; शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदारांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘राज्य सरकारने मला उपोषणाला बसण्याला भाग पाडू नये; संभाजी छत्रपतींचा इशारा