Home महाराष्ट्र अखेर ठरलं! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मंदिरे खुली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

अखेर ठरलं! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मंदिरे खुली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मंदिरं उघडण्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली  आहे.

रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरला राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा दिल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन व्हायलाच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचंच- अजित पवार

जळगावात भाजपला मोठा धक्का; तब्बल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा

सोमय्यांची अडवणूक करू नका, त्यांना कोल्हापूरला येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन