मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या जिम अखेर सुरू होणार आहेत. वारंवार मागणी केल्यानंतर अखेर राज्य सरकारने राज्यात जिम सुरू करण्यास परवानगी दिली असून 25 ऑक्टोबरपासून म्हणजे येत्या रविवारपासून जिम सुरू करण्यात येणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.
राज्य सरकारने आज परिपत्रक जारी करून हा निर्णय जारी करण्यात आला आहे. एसओपी (मार्गदर्शक सूचना) पालन करूनच या जिम सुरू करता येणार आहे. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये जिम सुरू करता येणार नसल्याचं राज्य सरकारनं आदेशात म्हटलं आहे. तसेच जिम सुरू केल्यानंतर जिम चालकांनी कोरोना बाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे, असं राज्य सरकारनं या आदेशात जाहीर केलं आहे.
दरम्यान, यामुळे राज्यातील जिम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबईतील सिटी सेंटर मॉलला भीषण आग; 10 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
खडसेंनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं- रामदास आठवले
खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर…- अंजली दमानिया
महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका