आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनानं योग्य ती पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं लसीकरणावर अधिक भर दिला आहे. तसेच लसीचे 2 डोस पूर्ण झाल्यानंतर घ्यावा लागणाऱ्या बूस्टर डोसची नियमावली मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केली आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
10 जानेवारीपासून नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, कोरोनामध्ये काम करणारे कर्मचारी तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या सर्वांना कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले असतील तरच हा तिसरा डोस घेता येणार आहे. तसेच नागरिकांनी ज्या लसीचे डोस आधी घेतले असतील त्याच लसीचा बूस्टर डोस त्यांना देण्यात येणार आहे. म्हणजे जर लसीचे दोन्ही डोस कोव्हॅक्सिन लसीचे असतील तर बूस्टर डोसही कोव्हॅक्सिन लसीचाच दिला जाणार आहे. जर दोन्ही डोस कोव्हिशिल्डचे असतील तर बूस्टर डोसही कोव्हिशिल्डचा देण्यात येणार आहे.
दरम्यान, 60 वर्षांवरील नागरिकांनी बूस्टर डोस घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं मुंबई महानगरपालिकेने सुचवलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात रावणासारखं दहा तोंडाचं सरकार; निर्बंधांवरून भाजपची टिका
“धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा”; करूणा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक”