Home महाराष्ट्र अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही देशमुख म्हणाले. तसेच देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. नव्या गृहमंत्र्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

राजीनामा पत्र :

प्रति,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती

आपला,

अनिल देशमुख


महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास CBI कडे”

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“अभिनेता अक्षय कुमारची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

“भाजपला धूळ चारत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला”