Home औरंगाबाद उद्धव ठाकरे पंतप्रधान बनतील या भितीने भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ मोठ्या नेत्याचा...

उद्धव ठाकरे पंतप्रधान बनतील या भितीने भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आता यावर युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे दावेदार होतील. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील आणि पंतप्रधान बनतील, अशी भीती भाजपला होती. त्यामुळेच भाजपने शिवसेना फोडली, असा दावा वरूण सरदेसाई यांनी यावेळी केला. ते उस्मानाबादमध्ये युवा सेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

हे ही वाचा : आता विठू-माऊलीचींही उद्धव ठाकरेंना साथ; पंढरपूरातून पायी चालत असंख्य वारकरी मातोश्रीवर”

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांच्या कोरोना काळातील कामाची दखल सगळ्यांनी घेतली. उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील ते दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. उद्या त्यांची लोकप्रियता अशीच राहिली तर 2024 ला ते पंतप्रधान पदाचे दावेदार बनू शकतील. या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केल्याचा आरोप वरूण सरदेसाईंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! नाना पटोलेंनी दिली नितीन गडकरींना काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर, म्हणाले…

“पंकजा मुंडेच्या पदरी पुन्हा निराशा; ‘या’ 2 नेत्यांवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

पुण्यात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील एकत्र; चर्चांना उधाण