खोटं बोला पण रेटून बोला हे फडणवीसांचं धोरण; राष्ट्रवादीची टीका

0
446

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती. आमचं सरकार स्थापन होणार होतं. त्यासाठी शरद पवार यांनीही पुढाकार घेतला होता. पण नंतर शरद पवार यांनी डबल गेम केला. त्यामुळे आम्हाला पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून आता राष्ट्रवादी पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांवर संकट?; थेट मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू”

खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? जाहीर व्यासपीठावरून वारंवार पवार साहेबांबद्दल अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे जे प्रयत्न फडणवीस यांनी चालवले आहेत त्यातूनच ‘पवार’ नावाच्या पॉवरची त्यांना किती भीती वाटते हे ते दाखवून देत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…; पंकजा मुंडे यांचा एल्गार

“वरात दारात येऊन थांबली, अन् नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून थक्क व्हाल”

“शरद पवारांच्या गुगलीला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, पवार साहेबांनी मान्य केलं की,…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here