मुंबई : छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा 6 मे रोजी स्मृतिदिन होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं होतं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला. त्यावरून फडणवीसांना ट्रोल करण्यात आलं. आता राष्ट्रवादीने ही या मुद्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
फडणवीसजी तुमचे पूर्वज शाहू महाराजांकडे कार्यकर्ते म्हणून झाडू मारायला होते, हे विसरू नका. जाणीवपूर्वक केलेल्या या चुकीची छत्रपती शाहू स्मारकावर नाक घासून माफी मागा, नाहीतर तुमचे कार्यकर्ते तुम्हाला महाराष्ट्र ट्रोल करतोय म्हणून परत निवेदन सादर करायला जातील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
फडणवीस जी तुमचे पुर्वज “शाहु महाराजांकडे” कार्यकर्ते म्हणुन झाडू मारायला होते हे विसरू नका. जाणीवपूर्वक केलेल्या या चुकीची “छत्रपती शाहु” स्मारकावर नाक घासुन माफी मागा नाहीतर तुमचे कार्यकर्ते तुम्हांला महाराष्ट्र ट्रोल करतोय म्हणुन परत निवेदन सादर करायला जातील . pic.twitter.com/o8hoOLiiB1
— Amol mitkari (@amolmitkari22) May 6, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही- नारायण राणे
17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल
…त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा- चंद्रकांत पाटील
“तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…”; राज्य सरकारचं आवाहन