मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ पाहणं बंद करावं, असा टोला काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात करोनाचं संकट आहे. या संकटाशी एकत्रितपणे लढा देण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांच्या भेटी घेत आहेत. महाराष्ट्रातलं सरकार पाडून सत्ता स्थापन करण्याची स्वप्नं पाहतं आहे. मात्र त्यांचे हे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असं नितीन राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये. करोना युद्धात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मात्र यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही, अशीही टीका नितीन राऊत यांनी केली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिलं आहे.
BJP yahan pradesh ki sarkar girane mein lagi hui hai. Mungeri lal ke haseen sapne dekhne ka kaam Narendra Modi aur Devendra Fadnavis ko bandh karna chaiye. Corona ke yudh mein sabko sath aana chaiye. Lekin inko kisi bhi prakar ki lajja nahi aa rahi hai: Nitin Raut,Maharashtra Min pic.twitter.com/qvQqtF3np6
— ANI (@ANI) May 26, 2020
महत्वाच्या घडामोडी –
भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण
“नारायण राणेंच शिवसेनेशी जुनं नातं, ते सेनेमुळेच मोठे झालेआणि सेने मुळेच रस्त्यावरही आले”
जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला चिमटा; म्हणाले…
राहुल गांधींच आजचं विधान स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारं आहे- देवेंद्र फडणवीस