मुंबई : राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लसीकरण सुरु आहे. पण दुर्देवाने लसी कमी पडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा सर्वाधिक साठा आहे ते दाखवून द्यावं. आम्ही आमच्याच राज्यांच्या लोकांना कसं घाबरवू?, असं जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करु शकत नाही. आम्हाला लसी कमी पडत आहेत म्हणूनच तर लसी मागत आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी दिल्लीच्या बाजूने न बोलता महाराष्ट्राच्या बाजून बोलावं. त्यांनी लसीची मागणी केली असती तर बरं झालं असतं, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही”
मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, आता लस विकू नका म्हणजे झालं- अतुल भातखळकर
कोणत्या शहाण्याने मास्क लावण्याचा सिद्धांत काढला?- संभाजी भिडे
वकील आहात, त्यामुळे लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका- नितेश राणे