फडणवीस, शेलार आमच्या मालकांकडे समर्थनासाठी चपला घासतात; मनसे नेत्याचं केंद्रीय मंत्र्याला जोरदार प्रत्युत्तर

0
563

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे आमदार राजू पाटील यांनी आज माध्यमांशी बोलत असताना एक मोठं विधान केलं आहे.

आमच्या मालकांकडे समर्थनासाठी फडणवीस, शेलार शिवतीर्थावर आपल्या चपला घासतात, असं विधान राजू पाटील यांनी यावेळी केलं.

अंबरनाथ येथील भाजपच्या सभेत बोलताना, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांचे पक्ष मालकी तत्त्वावर असल्याचं म्हटलं होतं. हे सर्व पक्ष मालकी तत्वावर चालतात. देश किंवा संविधान वाचवण्यासाठी हे पक्ष एकत्र आले नाहीत तर स्वतःचे पक्ष वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका कपिल पाटील यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना राजू पाटील यांनी वरील विधान केलं.

ही बातमी पण वाचा :  …तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडणार; बच्चू कडूंचा इशारा

आम्ही विरोधात गेलो तर महाराष्ट्रात भाजपची काय परिस्थिती होईल याचं चिंतन ‘त्यांनी’ करावं, असा इशारा राजू पाटील यांनी कपिल पाटील यांना यावेळी दिला. तसेच आमच्या पक्षाचे मालक राजसाहेब ठाकरे आहेत, हे सत्यच आहे. परंतु याच आमच्या मालकांकडे समर्थनासाठी फडणवीस, शेलार शिवतीर्थावर आपल्या चपला घासतात याचे भान सन्माननीय मंत्री महोदयांनी ठेवायला हवे, असा टोला राजू पाटील यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवारांमध्ये, पंतप्रधान होण्याची क्षमता, मात्र…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान

प्रियंका चतुर्वेदींचा नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या,’नारायण राणेंना त्यांची…’

लोकसभेत राहुल गांधींनी, भाजप खासदारांना दिलेल्या प्लाईंग किसवर, आता प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here