आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
शपथविधी होण्यापूर्वी काही तास आधीपर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्याला मोठी कलाटणी मिळाली आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…
तुम्हाला अंधारात ठेवून सर्व निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तुम्हाला घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं, हे तुमचं दुर्दैवं आहे., असा खोचक टोला राऊतांनी यावेळी फडणवीसांना लगावला. यावेळी राऊतांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं.
ओबीसी आरक्षणाचं काम एकनाथ शिंदे यांच्या आकलनापलीकडचे आहे. पण देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, की दिल्लीत तुमचं वजन असेल, तर ते वापरा आणि ओबीसीचा प्रश्न सोडवा. पण आता दिल्लीत तुमचं वजन कमी झालं आहे, हे दिसून आलं आहे. तुम्हाला अंधारात ठेवून सर्व निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तुम्हाला घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं, हे तुमचं दुर्दैवं आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यांच्या बुद्धीचातुर्याबद्दल आणि अभ्यासाबद्दल मला खूप अभिमान आहे, असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट
देवेंद्र फडणवीस वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण