“देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत; 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात”

0
296

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठे विधान केले.  ते पुण्यात पत्रकार परिषद बोलत होते. देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात. फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, गृह खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका. अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात जे चाललंय ते भयानक; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

राष्ट्रवादीचं ऑपरेशन कमळ; येत्या शुक्रवारी भाजपचे 14 आमदार राष्ट्रवादीत, तर काही शिवसेनेतही जाणार?

शिवसेना-राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

आमचे ‘ऑफर’ काही मैदानात पडलेले नाहीत- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here