Home महाराष्ट्र शिवसेना-राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

शिवसेना-राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : किरीट सोमय्या यांच्याकडून होत असलेल्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील हे मास्टरमाइंड असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही वेळेपूर्वीच पत्रकार परिषदेत केला. यांनतर लगेच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

मुश्रीफ यांनी घोटाळ्याच्या मुद्द्यावर बोलावे. ते या मुद्द्यावर बोलूच शकत नाही. अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन भाजप केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना, आमदारांना लक्ष्य करत आहेत. मात्र काँग्रेसच्याही दोन नेत्यांचा प्रताप आम्हाला माहिती पडला आहे. दोन दिवसात त्यांचेही प्रकरण पुढे येणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या नेत्यांची नावे सांगण्यास चंद्रकांत पाटलांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे काँग्रेस नेते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

आमचे ‘ऑफर’ काही मैदानात पडलेले नाहीत- देवेंद्र फडणवीस

“ठाण्यात मनसेचं खळखट्याक, कशेळी टोल नाक्याची केली तोडफोड; पहा व्हिडिओ”

किरीट सोमय्यांवर 150 कोटींचा दावा करणार- हसन मुश्रीफ

सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही- संजय राऊत