मराठा समाजाच्या दृष्टीने हा अत्यंत दुर्दैवी दिवस- संभाजीराजे भोसले

0
368

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.

बहुजन समाजाला आरक्षण मिळावं अशी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. गरीब मराठ्यांसाठीच माझा हा लढा होता. बहुजन समाजात समावेश करुन घेतलं तर जातीय मतभेद ते कमी होतील, विषमता कमी होईल असा माझा प्रयत्न होता. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून तो मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी दिवस आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सांगितलं. तसंच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचा उल्लेख करत मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ममतादीदी हरल्या म्हणून काय झालं, त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार- संजय राऊत

“भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झालं असेल”

उद्या भाजपाची राज्यभरात निदर्शनं; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here