नागपूर : नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धडाका उडाला आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते आशिष देशमुख भाजपचा प्रचार केला. यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
आशिष देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार पार्वता काळबांडे यांच्या प्रचारासाठी सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस हादरली आहे.
दरम्यान, आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे आशिष देशमुख यांची काँग्रेसमध्ये कोंडी होत असल्याची चर्चा आहे. आशिष देशमुख आधी भाजपामध्ये होते. भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले होते.
महत्वाच्या घडामोडी –
धक्कादायक! साताऱ्यात स्मशाभूमीतच मुलीची पूजा; ग्रामस्थांना प्रकार कळताच मांत्रिक पसार
राज साहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांची मागणी
शिवसेनेची बारामतीवर नजर! संजय राऊत म्हणतात…