मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. तसेच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय., असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. तसेच सुप्रीम कोर्टाने ईडीला आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलंहे, होतं., असंही नवाब मलिक म्हणाले.
ईडी मार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी. परंतु ज्या पध्दतीने भाजपाचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, असं नवाब मलिक यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“भर लग्नात नवरदेवीने लगावले ठुमके, वऱ्हाडी आणि पाहुणे पहातच राहिले; व्डिडिओ होतोय व्हायरल”
“ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आम्ही दबावाला बळी पडणार नाही”
आमची ईडी लागली, आता तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला
“चंद्रकांत पाटील हे पलंगावरून जरी खाली पडले, तरी त्यांना सरकार पडलं असं वाटत असेल”