आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे हेदेखील चुकीचे आहे. यांना आता घरी बसविले पाहिजे, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. यावर आता धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे.
हे ही वाचा- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक; 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरे
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जर 50 हजार कोटींची निधी आणला असेल तर ते त्यांनी दाखवावे. जे काम त्यांनी केले नाही, त्या कामाचे श्रेय घेणे चुकीचे आहे. तुम्ही कुठे होते हे सगळ्यांना ठाऊक आहे, असं म्हणत ओबीसींचे राजकीय आरक्षणाचा नेमका विचका कोणी केला, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. पण यासंदर्भात ते कधीही बोलत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
“आता पक्षात येतो का अन्यथा बघू तुला , तुझ्यावर केस करतो अशा धमक्या काही जण देत आहेत. राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनीदेखील पाहिले पाहिजे. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे हेदेखील चुकीचे आहे. यांना आता घरी बसविले पाहिजे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
जरा लाज वाटू द्या; पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या
भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, कसलीही चाैकशी नाही, शांत झोप लागते; भाजपच्या ‘या’ नेत्याचं विधान
आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होणार; नाना पटोलेंचा दावा