मुंबई : भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनाही ट्विटवरुन ट्विट करत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना इशारा दिला. यावरुन राष्ट्रवादीने भातखळकर यांना प्रत्यृत्तर दिलं आहे.
तुमच्या 54 वर्षाच्या अयुष्यात 50 वर्षाचा राजकारणाचा प्रवास आहे शरद पवारांचा. तुम्ही जेव्हा हाफ चड्डी घालायला शिकलात तेव्हा पासून साहेब फुल पॅन्ट मध्ये वावरत आहेत, हे विसरु नका.., असं म्हणत राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी फेसबुकवरुन भातळकरांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार हे राजकारणाचे पितामह म्हणून ओळखले जातात आणि त्यात त्यांच्या 80 वर्षाच्या वयात पन्नास वर्ष फक्त राजकारणातल्या सहभागाची आहेत. त्यामुळे पवारसाहेबांवर उपहासात्मक टीका करून निगेटिव्ह पब्लिसिटी करून घेणे तुम्हाला शोभत नाही, असं राज राजापूरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात जाणावतायत का??? काका जरा जपून…”, असं ट्विट भातखळकर यांनी केलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरे लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार; सरकारचा मोठा निर्णय
“उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त 1 करोड जाहीर करताना लाज वाटली नाही का?”
“चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी”