मुंबई : 2014 च्या वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टाकडून वाॅरंट जारी करण्यात आलं होतं. तसेच कोर्टाने राज ठाकरेंना दोन समन्स बजवाले होते मात्र कोर्टात हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांना आता आदेश दिला आहे.
राज ठाकरे आज दुपारी 12 वाजता कोर्टात हजर राहणार आहेत. दरम्यान वाशी टोलनाक्याजवळ जवळपास 2000 कार्यकर्ते राज ठाकरेंची वाट पाहत आहेत. यावेळी मनसे सैनिकांनी इशारा दिला आहे. निकाल काहीही लागूदे पण जर राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू, असा इशारा मनसे कार्यकर्ते विनोद पाखरे यांनी दिला आहे.
दरम्यान, आम्ही राज ठाकरेंसोबत न्यायालयात जाणार असल्याचं पाखरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सचिन तेंडूलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
“महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी काही घेणंदेणं नाही”
फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान
जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवलीये- जयंत पाटील