आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. या आधारेच विधानसभा अध्यक्षांनी वेगळा गट म्हणून शिंदे यांना मान्यता दिली आहे. खरी शिवसेना कुणाची याची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतही सुनावणी सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. याची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे.
हे ही वाचा : “उद्धवभाऊ, मुख्यमंत्री असताना राज ठाकरे मैदानात उतरले, आता काय झालं?”
अशातच सर्वोच्च न्यायालयाने 14 किंवा 15 तारखेला निकाल देत महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त केली; अथवा हे सरकार चुकीचं आहे, असा निर्णय दिला तर, राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला होता. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्या जरी कुणी अपात्र ठरले आणि इतर कुणी सत्तास्थापनेचा दावा केला, तर राज्यपालांना संधी द्यावीच लागेल. ज्यावेळी त्रिशंकू परिस्थिती असते तेव्हा राष्ट्रपती शासनाची परिस्थिती उद्भवते. तुम्हाला आम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? उठसूठ निवडणुकीला सामोरे जायला., असं मत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केलं. ते माध्यमांशी बोलत होते.
असीम सरोदे विधिज्ञ आहेत, वकिलीचा त्यांचा अभ्यास केला आहे, त्यामुळे आक्षेपार्ह विधान करायचे नाही. पण मला वाटत नाही, ते म्हणाले तसं काही होणार नाही. तसेच जर तरच्या विधानांना अजित पवार उत्तर देत नसतो, असे ठामपणे अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; बाळासाहेब थोरातांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा”
आदित्य ठाकरेंची, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, म्हणाले…
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…