मुंबई : ताैक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दाैऱ्यावर होते. त्यांच्या या दाैऱ्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केलीय. पंचनाम्यांचा हिशेबही पूर्ण झाला नसताना ते केंद्राच्या तिजोरीत डोकावू लागलेत. देण्यापेक्षा मागणं हाच या ठाकरे सरकारचा बाणा झालाय., असा हल्लाबोल भातखळकरांनी यावेळी केला.
वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केलीय. पंचनाम्यांचा हिशेबही पूर्ण झाला नसताना ते केंद्राच्या तिजोरीत डोकावू लागलेत. देण्यापेक्षा मागणं हाच या ठाकरे सरकारचा बाणा झालाय.https://t.co/mW7wReibGB
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील- प्रवीण दरेकर
“३ तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या”
सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील
“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”