Home पुणे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील

सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील

पुणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दाैऱ्यावर जाणार आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे, असा टोमणा चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.

दरम्यान, महाराष्ट्रातील हवामान हे पंतप्रधानांच्या पाहणी दौऱ्यासाठी योग्य नव्हते म्हणून मोदी महाराष्ट्रात आले नाहीत, असंही चंद्रकांत पाटीलांनी म्हटलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”

“मोदी संवेदनशील, ते महाराष्ट्रालाही मदत करतील, मात्र मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही”

राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन कायम?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

“वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला, तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?”