एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का : ‘या’ माजी आमदार-सभापतींसह 35 सरपंच शिंदे गटात सामील

0
277

मुंबई :  एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढच नाही तर अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामिल झाले. अशातच आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचा काँग्रसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

नाशिकच्या मनमाडनंतर इगतपुरीत तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी सभापती संपत काळे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील आजी माजी 35 सरपंच युवासेना पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांची बीड ते मुंबई पायी ‘निष्ठा’ यात्रा

वेदांता-फाॅक्सकाॅननंतर आता ‘हा’ मोठा प्रकल्पही राज्याबाहेर?; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

“नाशिकमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन; रस्त्यावर पिंडदान करत केली ‘ही’ मोठी मागणी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here