आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड करत राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर अनेक पक्षांचा शिंदे गटाकडे जाण्याचा कल वाढला. आता अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनंतर आता ठाण्यात राष्ट्रवादीचा एक मोठा नेता शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : ठाकरे गटाची ऑफर स्विकारणार का?; पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाल्या…
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हेच शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, नजीब मुल्ला शिंदे गटात गेल्यास हा ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसरणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”
नाॅट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील आज विभागीय कार्यालयात दाखल, म्हणाल्या…
“नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार”