एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला धक्का; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

0
370

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धक्का दिला आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे सूरतला निघाल्यानंतर, उद्धवजींनी मला संपर्क केला आणि…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

उल्हासनगर शहराचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिलीप गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका ज्योती गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवेसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, निष्ठावंत म्हणून गायकवाड यांनी सुरूवातीला ठाकरे गटातच राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना उल्हासनगर शहरप्रमुखपदी नियुक्त केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट शहरात तग धरून होता. मात्र शुक्रवारी दिलीप गायकवाड यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवारांना, देवेंद्र फडणवीसांची भिती वाटत होती, कारण…; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट

राष्ट्रवादीचा वंचित आघाडीला धक्का; वंचितच्या शहराध्यक्षांसह हजारो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पहाटेच्या शपथविधीवर आता खुद्द शरद पवारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here