Home महाराष्ट्र शरद पवारांना, देवेंद्र फडणवीसांची भिती वाटत होती, कारण…; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा...

शरद पवारांना, देवेंद्र फडणवीसांची भिती वाटत होती, कारण…; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत 2019 साली 72 तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवारांसोबत झालेला शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा गाैफ्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला होता. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहाटेच्या शपथविधी झाला नसता, तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले का इशारा काफी है, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवारांनी यावेळी केली. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा वंचित आघाडीला धक्का; वंचितच्या शहराध्यक्षांसह हजारो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती. फडणवीसांनी 2014-19 या काळात ज्यापद्धतीने काम केलं आहे, अशा स्थितीत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील 15 वर्षे सत्तेत येता येणार नाही, अशी भीती शरद पवारांना वाटत होती, असं बावनकुळे म्हणाले. ते टी.व्ही 9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, शरद पवारांनी मान्य केलं की, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी त्यांनी सारं षडयंत्र रचलं होतं. माझं व्यक्तिगत मत आहे की, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून त्यांनी साऱ्या युक्त्या केल्या., असंही बावनकुळेंनी यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

पहाटेच्या शपथविधीवर आता खुद्द शरद पवारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

 बाॅलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन, म्हणाले…

उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश