बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

0
152

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीचा राजकारणातील प्रभाव कमी करण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावं, असं आवाहन केलं होतं. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवसेना वाढवण्यासाठी तुमचं योगदान काय आहे? तुम्ही आयत्या बिळात नागोबा झाला. आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याच काम तुम्ही केलं. कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केलं, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची टीका, म्हणाले…

घरंदाज म्हणजे निवडणूक एकाबरोबर लढायची. लग्न दुसऱ्याबरोबर करायचं आणि हनीमून तिसऱ्यासोबत करायचा. बाळासाहेब असते तर यांना जोड्यानं मारलं असतं. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. आपल्या सहकाऱ्यांचे गळे घोटण्याचं काम केलं, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी चढवला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राजकारणात मोठी खळबळ ; ‘या’ महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप

शरद पवार गट आणि भाजपला धक्का ; १५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

अपेक्षा होती खरा निकाल लागेल मात्र…; अपात्रतेच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here