आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं आहे.
हे ही वाचा : ‘राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार, फक्त…; अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
नगर विकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारात काम करीत होते. कागलबरोबरच गडहिंग्लज मुरगुड शहरासाठी मी विकासकामांना जेवढा निधी मागितला तेवढा त्यांनी दिला. त्यांनी माझा नेहमी सन्मान केला, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
आज जरी ते आमच्या विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी कागलला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. याबद्दल मला जाहीर आभार मानलेच पाहिजेत, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; विरारमधील शिवसैनिकांचा महादेवाला रक्ताचा अभिषेक”
“शिवसेनेशी गद्दारी करणारे बंडखोर नव्हे तर हरामखोर, आता तर ते आता माझे वडीलही चोरायला निघाले आहेत”