गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

0
153

जळगाव : ईडीकडून चौकशीची तारीख आली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोना होतो, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला होता. त्याला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

कोरोनामुळे किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी वीस दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. मला अशा प्रकारची नौटंकी जमत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

गिरीश महाजन कोरोनामुक्त झाले त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जळगावची महानगरपालिका गिरीश महाजन यांच्या हातातून गेल्यामुळे त्यांना चांगलाच झटका बसला आहे. कदाचित त्यामुळे त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात एम एस रेड्डी निलंबित

भाजप – राष्ट्रवादीचं सोडा; पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आता अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

पवारांची तब्येत बिघडली माहित आहे, पण सरकारचं माहित नाही- चंद्रकांत पाटील

ईडीकडून चौकशीची तारीख आली की एकनाथ खडसे यांना कोरोना होतो- गिरीश महाजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here