आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गट हा मनसेमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी यावेळी दिली. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, नामांतराला स्थगिती नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट
आजारी पडल्यानंतर भेट घेणं स्वाभाविक आहे मात्र दीड तासाच्या चर्चेत मनसेनं सत्तेत सामील व्हावं अशी चर्चा झाली का? एकनाथ शिंदे यांच्या गटाला आगामी काळात कुठेतरी जावे लागले. कोर्टाने काही निर्णय दिला तर एक तर प्रहार गटात जावे लागेल किंवा मनसेमध्ये जावे लागणार आहे. त्यांना कोणत्या तरी गटामध्ये सामील व्हावे लागणार आहे. मनसेत जाण्याच्या दृष्टीने सामील होण्याबाबत चर्चा झाल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे, असा दावा एकनाथ खडसेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंनी शिवसेना ‘सोडली’, पण…; राष्ट्रवादी नेत्याची टीका
महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी होणार?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…