मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काहीदिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटी घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आज पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत होते. उदय सामंत यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
एकनाथ खडसे आणि आपण एकत्र पवारांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूर करण्यासाठी आपण गेलो होतो. त्याचबरोबर एशियाटिक लायब्ररी आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासंर्भात काही सूचना मला करण्यात आल्या होत्या. त्याबाबत माहिती देण्यासाठी आपण पवारांची भेट घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं.
दरम्यान, आपण पोहोचलो त्यावेळी खडसेही आले. जी चर्चा झाली ती त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आणि त्यांनी मला दिलेल्या कामाबाबत झाली, अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार; हर्षवर्धन पाटलांनी दिली माहिती
चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांना उपचाराची गरज; संजय राऊतांचा टोला
मोदींना पाहून लोकांनी मतदान केलं, बाळासाहेबांना पाहून शिवसेनेला सत्ता दिली- राज ठाकरे
CBSE Board Exam! बारावीच्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय