अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. पत्रकार परिषदे रूपाणी हे आधी राज्यपालांना भेटले. राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली.
दरम्यान,रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
महत्वाच्या घडामोडी –
साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
“साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू”
सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा