महाराष्ट्रात दसरा-दिवाळीला पुन्हा एक राजकीय भूकंप होणार?; शिंदे गटातील मंत्र्याचा मोठा गाैफ्यस्फोट

0
157

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सूरू असल्याचं चित्र सध्या राज्यात सूरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे मंत्रीमंडळ विस्तार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असलेल्या मंत्रीमंडळाने कारभार पाहिल्यानंतर आत्तापर्यंत फक्त एकच मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही. त्यासंदर्भात सातत्याने पुढची तारीख मिळत असताना आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी”

महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता शंभूराज देसाई यांनी वर्तवल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे., असं शंभूराज देसाई म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा झाली आहे. काही नेत्यांची चर्चा सुरू आहे. हे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा, असं शंभूराज देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, दसरा-दिवाळीत नेहमीच मोठे धमाके होत असतात. यावेळीही मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे, असा गाैफ्यस्फोटही शंभूराज देसाईंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

…तर माझीच आता अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड इशारा

अजित दादा मुख्यमंत्री होणार?; खुद्द शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“मोठी बातमी! अजित पवार गटातील आमदारांचा मोठा निर्णय, 25 आमदार राजीनामा देणार?”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here