Home महाराष्ट्र भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला- रोहित पवार

भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला- रोहित पवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे.

काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आज कोल्हापूरातील दसरा चौकात युवा मेळावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील हे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, साडीमध्ये पैसे खाल्ले., असा आरोप रोहित पवारांनी केला.

हे ही वाचा : चंचल स्वभावाचे राज ठाकरे ऋतुप्रमाणे रंग बदलतात- गुलाबराव पाटील

जे लोक देवीला सोडत नाहीत त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाही, ही सर्वसामान्यांची भूमिका आहे. यापुढील काळात युवकांसाठी काम करावंच लागेल. इथल्या मुलांमध्ये क्षमता आहे, फक्त त्यांना संधी दिली पाहिजे., असंही रोहित पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

“कोकणात शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ निष्ठावान कार्यकर्त्यानं हाती बांधलं शिवबंधन”