“दुर्देवी! कोल्हापूरच्या केशवराज भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकून महिलेचा मृत्यू”

0
382

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : आपल्यासोबत कधी काय होईल, याचा भरोसाच नाही. कुणाला कधी काय होईल, याचा भरोसा नाही. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे.

एक महिला नाट्यगृहात कार्यक्रमासाठी गेली होती. या दरम्यान ही महिला नाट्यगृहाच्या स्वच्छतागृहात गेली पण त्यावेळी एक अनपेक्षित अशी घटना घडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

ही बातमी पण वाचा : “ठाकरे गटात मोठी उलथापालथ; शीतल म्हात्रे, नीलम गोऱ्हेनंतर आता ‘या’ मोठ्या महिला नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”

कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली आहे, या ढिगाऱ्याखाली दोन महिला अडकल्या होत्या, यातल्या एकीचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला जखमी झाली आहे.

अश्विनी आनंदा यादव, असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे, तर संध्या तेली या जखमी झाल्या आहेत. या दोन महिला वॉशरूमला गेल्या असताना त्या भिंत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकल्या.

दरम्यान, यानंतर ताबडतोब बचाव कार्याला सुरूवात केली. या दोन्हीही महिलांचा कमरेपासूनचा खालचा भाग ढिगाऱ्याखाली अडकला होता. त्यांचे लोकेशन समजत नसल्याने बचाव पथकाला त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मोठी पराकाष्टा करावी लागली.

महत्त्वाच्या घडामोडी –

विधान भवनच्या कॉरिडॉरमध्ये जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांची गळाभेट, गप्पाही रंगल्या; चर्चांना उधाण

कल्याण! बाळ नाल्यात पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं?; बाळाच्या आजोबांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…

अजित दादा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here