Home महाराष्ट्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे- रामदास आठवले

राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे- रामदास आठवले

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच आता रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

राज्य सरकारने मराठा समाजाला आवश्यक असणाऱ्या आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्यानेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण प्रयत्न करणार आहोत. क्षत्रिय मराठा समाजातील गरिबांना आपण आरक्षण मिळवून देण्यासाठी मोदींना साकडे घालणार असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्र सरकारने आता तरी मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्यावा- चित्रा वाघ

मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल- प्रवीण दरेकर

फडणवीसांनी खोटं बोलून मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकण्याचे उद्योग बंद करावेत- नाना पटोले

मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप मोदी सरकारने निस्तारावे- सचिन सावंत