Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या घरातच थांबूया आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करुया, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून 30 एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा, असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?- किरीट सोमय्या

“महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान झालं आहे”

राज्य सरकारचा मोठा निर्णय; नववी, अकरावीच्या परीक्षा आणि दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

“सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचंय”