“ताईसाहेब काळजी करू नका, महाविकास आघाडीचं सरकार मुंडे साहेबांचं स्मारक नक्की बांधेल”

0
259

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी .यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारने गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक न बांधल्याने नाराजी व्यक्त केली. यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मत व्यक्त केलं.

ताईसाहेब काळजी करू नका, आप्पांचं स्मारक आमचं सरकार बांधेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

5 वर्ष सत्ता असूनही भाजप स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक उभं करू शकलं नाही. मात्र आता काळजीचं कारण नाही. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार मुंडे साहेबांचं स्मारक उभं केल्याशिवाय राहणार नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची एक विटही रचली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्मारकाच्या बांधणीची मागणी करण्याचा मला अधिकार नाही, असं म्हणत पंकजां मुंडे यांनी आपल्या भाषणातून भाजपवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या डोळ्यातले अश्रू मी सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाहिले”

आता ATM शिवायही काढता येणार पैसे; स्टेट बँकेंचा नवा उपक्रम

“एकवेळ माझ्या बाबांचं स्मारक करु नका, पण माझ्या शेतकऱ्यांना प्रश्नांकडे लक्ष द्या”

ज्यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं त्यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं?- एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here