अशा बलात्काऱ्यावर उपचार करू नका, वाचलाच तर… ; मनसे आक्रमक

0
4

मुंबई : पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यावरून मनसे नेत्या शालिनी ठाकरे आक्रमक झाल्या आहेत.

पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला रुग्णावर एका पुरूष रुग्णानं बलात्कार केला. यावरून महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं आहे. अशा बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत ही पहिली शिक्षा. त्यातूनही तो वाचलाच तर त्याला भर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी. बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाही,” असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

दरम्यान, चित्रा वाघ यांनीही संताप व्यक्त करत सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते ?,” असा सवाल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का?; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल

400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार; नितीन गडकरींना लिहिलं पत्र

दूध दरावरून राजू शेट्टी – सदाभाऊ खोत आंदोलनाच्या मैदानात आमने सामने

“यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here