Home महाराष्ट्र राज, उद्धव यांचं नका सांगू, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो- बच्चू कडू

राज, उद्धव यांचं नका सांगू, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो- बच्चू कडू

मुंबई : इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी (अकरावी सीईटी) उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली. अकरावी सीईटी न घेता दहावीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर शालेय राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

बच्चू कडू यांनी अकरावी सीईटीच्या मुद्यावर हायकोर्टानं हस्तक्षेप केला. हायकोर्टाचा असा निर्णय येईल, असं वाटलं नव्हतं, असं बच्चू कडू म्हणाले. अकरावीची सीईटी रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही. अकरावीच्या प्रवेशांना कुठेही अडचण येणार नाही, गरज पडल्यास जागांची संख्या वाढवू, असंही बच्चू कडू म्हणाले.

एकाही मुलाला प्रवेश मिळला नाही असं होणार नाही, असंही ते म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या सीईटीचे शुल्क भरलं असेल ते त्याला परत मिळेल, तो त्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बच्चू कडू यांनी पालकांनी शासकीय शाळांना पालकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन बच्चू कडूंनी यावेळी केलं.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलं खासगी शाळेत शिकली यासंदर्भात विचरालं असता त्यांच्या मुलांचे मला सांगू नका, माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय, असं बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट, चर्चांना उधाण”

“दारूच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात, भाजपने त्या बाटल्या लॅबमध्ये पाठवाव्यात”

…तर मग हे शुद्धीत कसे असणार?; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

“मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची संधी केंद्राने गमावली”