जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका; हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांना इशारा

0
435

 

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्यांकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. यावर हसन मुश्रीफ संतापले आहेत. माझ्या जावयाचा कशाशीही काहीही संबंध नाही. त्यांचं नाव सातत्याने घेऊ नका. हे काही बरोबर होणार नाही, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सोमय्यांनी तिसरा घोटाळा जाही केला. खरे तर ते दहा अकरा वर्षापूर्वीचे जुने कारखाने आहेत. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही तरी काढा असं त्यांना सांगत होतो. पण त्यांनी एक जावई शोध लावला आणि आज आणखी एक घोटाळा काढला. त्यात माझ्या जावयाचं नाव घेतलं. असं हसन मुश्रीफ म्हणाले.

मी त्यांना सूचना करेल जावयाचं नाव आणि कुटुंबीयांचं नाव ते सातत्याने घेत आहेत. हे काही बरोबर नाही. ज्याचा कशाचाही संबंध नाही. माझा जावई स्वत:चा व्यवसाय करत आहे. त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान सोमय्या करत आहेत. हे निषेधार्य आहे, असंही हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणाले…

“मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा”

“नाशिक हादरलं! ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार, सराईत गुन्हेगाराकडून चाकूच्या धाकाने अत्याचार”

भाजप-मनसेमध्ये ‘फॉर्म्युला ठरला; पालघर जि.प पोटनिवडणुकांसाठी आखली ‘ही’ रणनीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here