Home देश “मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा”

“मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंदीगड : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच पदरात पडेल असं सिद्धूंना वाटत होतं. मात्र, सिद्धूंकडे मुख्यमंत्रीपद आलं नाही. तसेच उपमुख्यमंत्रीपदही सिद्धूंना दिलं गेलं नाही. त्यामुळे ते नाराज होते. त्याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नाशिक हादरलं! ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार, सराईत गुन्हेगाराकडून चाकूच्या धाकाने अत्याचार”

भाजप-मनसेमध्ये ‘फॉर्म्युला ठरला; पालघर जि.प पोटनिवडणुकांसाठी आखली ‘ही’ रणनीती

“काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

“मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”