“आमच्या शिवरायांना विकू नका, नाहीतर…; सामनाचा रोख कुणाकडे?”

0
275

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना  जामीन मिळाला. यावर आता सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!, असं सामनात म्हटलं आहे.

हे ही वाचा : …म्हणून मी, माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील!, असा निशाणाही सामनातून लगावण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात घुसून आंदोलन केल्याने त्यांना अटक व सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मास आल्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे व बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. त्या इतिहासाची कोणत्याही पद्धतीची मोडतोड होता कामा नये, असंही सामनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“गजानन किर्तीकरनंतर आता ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडून, शिंदे गटात प्रवेश करणार”

जामीन मिळताच जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी…

ठाकरेंचा शिंदेशाहीला पुन्हा दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा ठाकरेंकडे गृहवापसी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here