बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळाव्याचं आयोजन केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.
एकवेळ माझ्या बाबांचं स्मारक करु नका, पण मराठवाड्यातील माझ्या शेतकऱ्यांना प्रश्नांकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांच्या गळ्यातील फासाचा दोर कायमचा दूर करा. शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्याची सोय करा, असं पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं.
गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची एक विटही रचली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्मारकाच्या बांधणीची मागणी करण्याचा मला अधिकार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवरच निशाणा साधला.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं. त्यामुळेच तुम्ही, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात. मात्र त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं आलं?, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या-
ज्यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं त्यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं?- एकनाथ खडसे
“पक्ष माझ्या बापाचा आहे, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही”
भारताचा विराट विजय; 67 धावांनी उडवला विंडीजचा धुवा