Home महत्वाच्या बातम्या आता भाजप सत्तेत आहे, त्यामुळे…; फोन टॅपिंग मुद्द्यावरून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

आता भाजप सत्तेत आहे, त्यामुळे…; फोन टॅपिंग मुद्द्यावरून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले होते. फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या काळात झाल्याचा दावा  देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्याला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.

मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजप करत आहे. पण मनमोहन सिंग यांच्या काळात ज्यांनी ज्यांनी असे प्रकार केले, त्यांच्यावर मनमोहन सिंग यांनी कारवाई केली होती. आता भाजप सत्तेत आहे. त्यांनी देखील कारवाई करावी. नुसतं देशाला बदनाम करण्याचा दावा करू नये, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने पेगॅसस हे हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करून जगातील 1400 लोकांचे फोन हॅक केले दावा करण्यात आला आहे. तर 300 भारतीय तसेच काही पत्रकारांचे देखील फोन टॅप झाल्याचा दावा 15 मीडिया संस्थांनी केलाय. याच मुद्द्यावरून आता देशभरात वातावरण तापलेलं दिसत आहे. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात काँग्रेसला दोषी ठरवलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत चक्क मास्क लावला”

मुंबई आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य शिवसेनेत- अतुल भातखळकर

“महाराष्ट्रात मंदीरे बंद, डान्स बार सुरू, यातून राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड”

“नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल”