Home महाराष्ट्र मराठी माणसाला डिवचू नका; वादग्रस्त विधानावरून, राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा

मराठी माणसाला डिवचू नका; वादग्रस्त विधानावरून, राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं.  मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही., असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहेय

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याबद्दल बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

हे ही वाचा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन व जमीन मशागत करूण ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले. आणि येत आहेत ना? दुसरीकडं त्यांना असं वातावरण मिळेल का?

उगीच निवडणूकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दूधखुळे नाहीत. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही; राज्यपालांचं वादग्रस्त विधान

मराठा समाजाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाकडून EWS आरक्षण रद्द

सत्ताबदलावर अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…